चित्रलेखा पाटील यांनी केले विशेष कौतुक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, वेश्वी-अलिबाग महाविद्यालयाचा विराज गणेश म्हात्रे हा मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित 54 व्या युवा महोत्सवात कांस्यपदकाचा मानकरी ठरला आहे. त्याने युवा महोत्सवातील भारतीय पारंपरिक तालवाद्य स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
या नेत्रदीपक यशाबद्दल सस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी अभिनंदन केले आहे. शैक्षणिक वर्ष 2021 -2022 या वर्षातील मुंबई विद्यापीठ अंतर्गत 54 व्या युवा महोत्सवात 3 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान झोनल लेवल सिलेक्शन राऊंड घेण्यात आला होता. यामध्ये रायगड साऊथ झोन मधून विराजने प्रथम क्रमांक पटकावत आपले स्थान अंतिम फेरीमध्ये निश्चित केले.
अंतिम स्पर्धेला 1 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली यामध्ये 3 फेब्रुवारी 2022 रोजी इंडियन क्लासिकल इन्स्ट्रुमेंट तालवाद्य प्रकारामध्ये दूसरा क्रमांक पटकावत स्थान मिळवले व मुंबई विद्यापीठ अंतर्गत युवा महोत्सवात विराज म्हात्रे सिल्व्हर पदकाचा मानकरी ठरला आहे. या पूर्वी विराज म्हात्रे यांनी सह्याद्री वाहिनीवरील भजनमाला या कार्यक्रमात भजनमाला या कार्यक्रमात सादरीकरण केले आहे तर दूरदर्शन रेडिओ कार्यक्रमात साथसंगत केली आहे.अनेक भजन स्पर्धेत उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून परितोषिक पटकाविले आहे. या स्पर्धेची सगळी सूत्रे व स्पर्धेचे नियोजन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. नम्रता चोगले व प्रा. निकीता पाटील यांनी पाहिले.