नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
विराटने कर्णधारपद सोडलं नाही. त्याला ते सोडण्यासाठी भाग पाडण्यात आलं आहे, असा आरोप पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने केला आहे. तो पुढे म्हणाला, की मला माहीत होतं की जर त्यांनी टी-20 विश्वचषक जिंकला नसता, तर खूप मोठी समस्या निर्माण झाली असती आणि तसंच झालं. विराटच्या विरोधात एक गट आहे, काही जण त्याच्या विरोधात आहेत. आणि हेच कारण आहे त्याने कर्णधारपद सोडण्याचं. आता जर त्याने कर्णधारपद सोडलंच आहे तर आता त्याने जास्त मेहनत घेण्याऐवजी कठोर मेहनत घ्यावी आणि आपल्या नैसर्गिक खेळीमध्ये खेळावं. सगळा देश त्यांच्यावर प्रेम करतो. सध्याचा काळ त्यांची परीक्षा पाहतो आहे. त्यांनी आता खंबीरपणे यातून बाहेर यायला हवं.







