ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांकडून विराट कोहलीचे कौतुक

| इंग्लंड | वृत्तसंस्था |

ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे कौतुक केले आहे. एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये बोलताना कॅमेरून म्हणाले- मी विराट कोहलीचा चाहता आहे. त्याची नेतृत्व गुणवत्ता उत्कृष्ट आहे.

द इंडिया सेंच्युरीच्या या समिटमध्ये जेव्हा कॅमेरून यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल प्रश्‍न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले- जेव्हा मी मोठा होत होतो तेव्हा मला भारताचे बिशन सिंग बेदी खूप आवडायचे. यानंतर मला राहुल द्रविडची फलंदाजीही खूप आवडली. त्याने इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावले. मला ते चांगलंच आठवतंय. मला त्याची फलंदाजी आवडली. स्टोक्स करतो तशीच कॅप्टनशिप कोहलीनेही केली.

कॅमेरून यांनी विराट कोहलीचे वर्णन महान खेळाडू असे केले. ते कोहलीबद्दल म्हणाले की – यावेळी बेन स्टोक्स ज्या प्रकारे आमच्या (इंग्लंड) संघाचे नेतृत्व करत होता, त्याच पद्धतीने कोहलीही कर्णधार होता. या दोघांनी मैदानावर उत्कृष्ट नेतृत्व दाखवले आहे. विराट कोहली सध्या भारत आणि न्यूझीलंडसोबतच्या मालिकेत सहभागी होत आहे. तर बेन स्टोक्स पाकिस्तानसोबतच्या मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व करत आहे. भारतीय वंशाची ब्रिटिश प्रतिभा विलक्षण आहे. कॅमेरून यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटिश खेळाडूंबाबतही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले- अलीकडच्या काळात आपण भारतीय वंशाच्या उत्कृष्ट ब्रिटिश खेळाडूंची प्रतिभा पाहिली आहे. येत्या काळात आणखी भारतीय वंशाचे खेळाडू येणार आहेत.

Exit mobile version