विराट कोहलीची पंचासमवेत वादावादी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएलमधील काल रात्रीचा सामना वादांनी भरलेला होता. सामन्याच्या शेवटच्या क्षणी विराट कोहली अफगाण क्रिकेटर नवीन-उल-हकशी भिडला आणि त्यानंतर तो अमित मिश्रासोबत भांडतानाही दिसला.

सामना संपल्यानंतर तो पुन्हा एकदा नवीन-उल-हकशी भिडला आणि नंतर एलएसजीचा मार्गदर्शक गौतम गंभीरसोबत बराच वेळ वाद घातला. सध्या या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. यासोबतच बहुतेक क्रिकेट चाहते विराट कोहलीच्या या वृत्तीला चुकीचे ठरवत आहेत.

भारताच्या वरिष्ठ खेळाडूंबाबत विराटच्या वृत्तीवर क्रिकेट चाहते टीका करत आहेत.चाहत्यांचे म्हणणे आहे की, अमित मिश्रा आणि गौतम गंभीर हे विराट कोहलीच्या तुलनेत खूप सीनियर खेळाडू आहेत आणि प्रत्येक ज्युनियरने आपल्या सीनियरचा आदर केला पाहिजे. कोहली वरिष्ठांचा आदर करायला शिकलाच नाही का?. विशेष म्हणजे विराट कोहली याआधीही वरिष्ठ खेळाडूंशी पंगा घेत आहे.

विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार असताना एका टप्प्यावर अनिल कुंबळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. कोहलीला कुंबळेची कार्यशैली आवडत नसल्याच्या अनेक बातम्या मीडिया रिपोर्ट्समध्ये येत होत्या. अखेर कुंबळेला प्रशिक्षकपद सोडावे लागले.

त्याचप्रमाणे गेल्या वर्षी विराट कोहलीची बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही भांडण झाले होते. यानंतर या आयपीएलमध्येही विराट कोहली सौरव गांगुलीला रोखताना दिसला. याआधीही तो गौतम गंभीरसोबत भिडला आहे. आयपीएल 2013 दरम्यान त्यांच्यात खूप वाद झाला होता.

Exit mobile version