विराट कोहलीचे युवा खेळाडूंना मार्गदर्शन

| बार्बाडोस | वृत्तसंस्था |

भातीय क्रिकेट संघ बार्बाडोसमध्ये सराव करत आहे. विराट कोहलीने सराव सत्रात प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत बराच वेळ घालवला. नेट सरावातून मैदानावर सराव करण्याआधी कोहलीने युवा फलंदाज यशस्वी जैस्वालसोबत बराच वेळ घालवला. यादरम्यान त्याने यशस्वीला फलंदाजीच्या काही खास टिप्स दिल्या. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी खेळाडूंनी बार्बाडोसमध्ये सराव सुरू केला आहे. विमल कुमारने शेअर केलेल्या नेट प्रॅक्टिसच्या व्हिडीओमध्ये कोहली नेटमध्ये भारतीय गोलंदाजांचा सामना करत आहे. त्याच्या संघात युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल सराव करताना दिसला, ज्याची प्रथमच कसोटी मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. नेटमध्ये सराव संपल्यानंतर कोहलीने ग्राउंडवर सरावाला जाण्यापूर्वी राहुल द्रविडशी बराच वेळ गप्पा मारल्या. परिस्थिती, हवामान, रणनीती इत्यादींवर चर्चा केल्यानंतर कोहलीने यशस्वीसोबत बराच वेळ घालवला.

कोहलीने खास गुरुमंत्र
विराट कोहली यशस्वी जैस्वालला फलंदाजीच्या टिप्स देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. द्रविडच्या तुलनेत त्याने यशस्वी जैस्वालसोबत जास्त वेळ घालवला. कोहली हा जगातील अव्वल फलंदाज आहे आणि प्रत्येक खेळाडूला त्याच्यासोबत सराव शेअर करण्याची आणि त्याच्याकडून टिप्स घेण्याची संधी मिळावी असे वाटते. तुम्हाला माहिती आहेच की, यशस्वी जैस्वालने आयपीएलमध्ये सर्वांना खूप प्रभावित केले होते, त्यानंतर डब्ल्यूटीसी फायनलमध्येही त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. आता त्याचा वेस्ट इंडिज दौर्‍यावरील संघात समावेश करण्यात आला आहे.

Exit mobile version