| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रोहित व विराट यांनी त्यांच्या खेळीतून निवृत्तीच्या चर्चांवर टोलेबाजी केली आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन वन डे सामन्यांत शतक झळकावले आणि त्यामुळे तिसऱ्या सामन्याच्या तिकिटांसाठी प्रेक्षकांची झुंबड उडत आहे. विराट व रोहित यांना 2027 चा वर्ल्ड कप खेळायचा आहे, परंतु मुख्य प्रशिक्षक व निवड समितीला युवा खेळाडूंसोबत पुढे जायच आहे. रोहित व विराटचं वय त्यांना खटकतंय, परंतु त्यांचा फॉर्म जबरदस्त सुरू आहे. त्यामुळे ते दोन वर्षानंतर होणारा वर्ल्ड कप खेळतील, असा चाहत्यांना विश्वास आहे. .भारत आत आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका खेळतोय. त्यानंतर भारतीय संघाला न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका या संघांचा सामना करावा लागणार आहे. या मालिकेतील कामगिरी रोहित व विराटचं भविष्य ठरवणारी असणार आहे.
विराट-रोहित खेळणार 2027 चा वर्ल्ड कप
