सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास
| मुंबई | प्रतिनिधी |
विराटमध्ये अजून बरंच क्रिकेट (प्रेम) शिल्लक आहे आणि त्याने अजून खूप धावा करणं शिल्लक आहे. धावांची भूक आणि देशासाठी आणखी काही साध्य करण्याची इच्छा त्याच्यात कायम टिकून राहावी, असे उद्गार मास्टर बास्टर सचिन तेंडुलकरने काढले. एका मुलाखतीत बोलताना विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भविष्याविषयी भाष्य केलं.
तेंडुलकर म्हणाला की, विराटला भारताकडून खेळण्याआधीही मी पाहिले आहे. मी त्याला मोठं होताना पाहिले आहे, आणि मग तोच खेळाडू देशासाठी अशा अद्भुत गोष्टी साध्य करतो हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. आणि मला खात्री आहे त्याचा प्रवास थांबला नाहीये. दरम्यान, तेंडुलकरने विश्वचषकाच्या वेळी सुद्धा विराट कोहलीची एक खास आठवण शेअर करत त्याचे अभिनंदन केले होते. कोहली जेव्हा पहिल्यांदा ड्रेसिंग रूममध्ये आला होता तेव्हा बाकीच्या खेळाडूंनी गंमतीत त्याला माझा आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडायला सांगितले होते. विराटबरोबर मी ड्रेसिंग रूम शेअर केली आहे आणि त्याची नवी प्रगती अभिमानास्पद आहे असेही तेंडुलकरने म्हटले होते.