विराटची विश्‍वविक्रमाला गवसणी

| मुंबई । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा या महेलाच्या नावावर होता. महेलाने आतापर्यंतच्या टी-20 विश्‍वचषकातील सामन्यांमध्ये एकूण 1016 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने विश्‍वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यांत अर्धशतकं झळकावली, त्यामुळे त्याच्या नावावर विश्‍वचषकात 989 धावा झाल्या होत्या. त्यामुळे या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जर कोहलीने फक्त 28 धावा केल्या असत्या तर त्याच्या 1017 धावा झाल्या असत्या. पण या सामन्यात कोहलीला फक्त 12 धावा करता आल्या आणि हा विक्रम त्याच्यापासून लांब गेला.

पण आजच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मात्र त्याने या विश्‍वविक्रमाला गवसणी घातली. आजच्या सामन्यात कोहलीला 1017 धावा करण्यासाठी 16 धावांची गरज होती. कोहलीने सुरुवातीला आल्यावर दोन चौकार लगावले तेव्हाच तो हा विश्‍वविक्रम रचेल, असे वाटत होते. कोहलीने या सामन्याच्या सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेतली आणि आपला विश्‍वविक्रम पूर्ण केला.

Exit mobile version