विराटचे एकदिवसीय कर्णधारपदही धोक्यात

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
विराट कोहलीने टी-20चे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा नवीन कर्णधार झाला आहे. टी-20 विश्‍वचषकाच्या गट सामन्यातून भारत बाहेर झाल्याने संघात मोठे बदलाचे संकेत मिळत आहे. बीसीसीआय एकदिवसीय सामन्यांमधेही नवीन कर्णधाराचा विचार करू शकते. 2023 मध्ये एकदिवसीय विश्‍वचषक होणार आहे. बीसीसीआयला टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी एकच कर्णधार हवा आहे.मला खात्री आहे की बीसीसीआय विराटला वनडे कर्णधार म्हणून कायम ठेवणार नाही. याची शक्यता फारच कमी आहे. तो यापुढेही कसोटी कर्णधार असेलफ, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकार्‍याने पीटीआयला सांगितले. बीसीसीआयने एकदिवसीय संघाच्या कर्णधाराबद्दल अद्याप काहीही सांगितले नाही. परंतु, बीसीसीआयला 2023 मध्ये होणार्‍या 50 षटकांच्या विश्‍वचषकापूर्वी मर्यादित षटकांच्या (टी-20 आणि एकदिवसीय फॉर्मेट) संघाचा एकच कर्णधार हवा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Exit mobile version