| नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खंदे कार्यकर्ते वीरेंद्र जाधव यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक संघटनेचे अध्यक्ष महेबूब शेख यांनी वीरेंद्र जाधव यांना नियुक्ती पत्र दिले असून त्यावेळी राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष शंकर भुसारी हे सोबत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संघटना बांधणी करण्याच्या सूचना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि युअवक चे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांना दिल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांच्याकडून प्रदेश पदाधिकारी यांच्या नियुक्त्या राष्ट्रवादी काँग्रेस भवन मुंबई येथे करण्यात आल्या.त्यानुसार मागील काही दिवसात राष्ट्रवादी युवक काँग्रेस मधील प्रदेश पातळीवरील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यासाठी युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यात रायगड जिल्ह्याचे युवकचे जिल्हा अध्यक्ष पदावर कार्यरत असलेले कर्जतचे वीरेंद्र जाधव यांना बढती देण्यात आली आहे. वीरेंद्र जाधव यांना प्रदेश वर सरचिटणीस करण्यात आले आहे.
वीरेंद्र जाधव यांना प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती पत्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांचे हस्ते प्रदेश कार्यालयात देण्यात आले. वीरेंद्र हे एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रायगड जिल्हा उपाध्यक्ष होते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष या पदावर कार्यरत होते.







