विरेश्‍वर खोपोली, करंजा स्कूलची बाजी

फुटबॉल, मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचा पुढाकार

| उरण | वार्ताहर |
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या क्रीडा विभागाच्यावतीने राज्यस्तरीय, 14 वर्षांखालील जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा आणि जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. राज्यस्तरीय फुटबॉट स्पर्धेत विरेश्‍वर खोपोली संघाने, तर जिल्हास्तरीय स्पर्धेत द्रोणागिरी करंजा इंग्लिश मीडियम स्कूलने बाजी मारली. दरम्यान, जिल्हास्तरीय 14 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये खोपोली, पनवेल आणि उरणमधून एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अंतिम विजेता संघ द्रोणागिरी करंजा इंग्लिश मिडीयम हायस्कूल, तर मुळेखंड उरण येथील कोळी किंग हा संघ उपविजेता ठरला.

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये मुंबई, मुंब्रा, खोपोली, पनवेल आणि उरण येथील 16 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्याचा थरार वीर सावरकर मैदानावर अनुभवला. विरेश्‍वर खोपोली संघाने खोपोली संघाला 1 विरुद्ध शून्य गोलने पराभूत करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा विभाग प्रमुख भरत म्हात्रे, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, करण घरत, जयेश पाटील, सचिन पाटील, मुकेश घरत,प्रवीण घरत, प्रकाश भोईर, विजय पाटील, सुनीत घरत, दिवेश घरत, रवींद्र पाटील, आकाश पाटील, अ‍ॅड. मच्छिन्द्र घरत, द्रोणागिरी स्पोर्ट्सचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण तोगरे, राम चव्हाण, संजीव पाटील यांनी हातभार लावला.

सहा हजार स्पर्धक धावले
जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहा हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.21 किलोमीटर पुरुष ओपन गटात राज सरोदे प्रथम, द्वितीय स्वराज पाटील, तृतीय राजेश तांबोळी. उत्तेजनार्थ- प्रशांत घरत, सचिन कामत. तर, दहा किलोमीटर स्त्री ओपन गटात प्रथम- ऋतुजा सिकवण, द्वितीय- सुजाता माने, तृतीय- मयुरी चव्हाण, उत्तेजनार्थ- साक्षी पाटील, ईश्‍वरी चिर्लेकर तसेच विशेष विद्यार्थ्यांसाठी आयोजित 200 मीटर स्पर्धेत प्रथम- सिद्धांत पाटील, द्वितीय- दुर्वेश धोत्रे, तृतीय- निशांत कोळी, उत्तेजनार्थ- यश रुपनर यांनी बाजी मारली.

Exit mobile version