अंतुले महाविद्यालय विद्यार्थ्यांची दिघी पोर्टला भेट

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

दिघी पोर्ट लिमिटेड आयोजित राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कार्यक्रमांतर्गत अब्दुल सत्तार अंतुले हायस्कूलमध्ये दिघी पोर्ट सुरक्षा विभाग आणि अदानी फाऊंडेशनच्या वतीने सुरक्षा विषयक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विजेत्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित सर्वांना पर्यावरण व सुरक्षा विभागाचे विलास शिर्के व संरक्षण विभागाचे प्रमुख कर्नल अरविंद सिंह बेदी यांनी संकट व आणीबाणीच्या वेळी घ्यावयाची सुरक्षा व काळजी याबद्दल माहिती दिली. सोबतच मरीन कंट्रोल रूम, आपत्कालीन सुरक्षा विभाग, बंदर प्रबंधन, अग्निशमन सुरक्षा, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. अदानी फाऊडेशनच्या जयश्री काळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक माहिती व संधी याबद्दल मार्गदर्शन केले. 8 विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर दिघी बंदरातील विविध विभाग व त्यांची माहिती क्षेत्रभेटीअंतर्गत सर्वांना देण्यात आली.

पोर्ट मधील विविध विभागांचे कामकाज व त्याबद्दल प्रत्यक्ष भेटी द्वारे माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमासाठी दिघी पोर्ट चे अधिकारी, कर्मचारी संघटनेचे नेते सूरज मांजरेकर आणि सदस्य,मुख्याध्यापक अशोक पडवळ व शिक्षक विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी उपस्थित होते. राजकुमार कोलथळकर यांनी आभार मानले.

Exit mobile version