| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा परिसरातील वडगाव शाळेच्या विद्यार्थी गुणवत्ता व शिक्षकांच्या कार्याचे डायट संस्थेच्या प्राचार्यांनी पाहणी करून त्यांचे कौतुक केले. रायगड जिल्हा परिषद ग्रामीण उत्कृष्ट आदर्श शाळेला आज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य डॉ. सुभाष महाजन व केंद्रप्रमुख जे.पी. परदेशी यांनी सदिच्छा भेट दिली. महाजन यांनी शाळेच्या भौतिक सुविधा, मैदान, आवारभिंतीवरील चित्रकला, शैक्षणिक लेखन, पाणी फिल्टर, महावाचन चळवळीसाठी सुरू असलेले वाचन चटई व मुस्कान किताब घर, कम्पोस्ट प्लॅन्टर, भाज्यांची लागवड, वर्ग खोल्यांची रचना, हवेशीर व पुरेशा प्रकाशाची असून व्हर्टिकल पद्धतीने सुद्धा मुले अध्ययन करू शकतात. मुलांचे वाचन, डिजिटल साहित्य हाताळणी व स्वयं अध्ययन इत्यादी बाबींची पाहणी करत शिक्षकांच्या कामाचे व मुख्याध्यापक सुभाष राठोड यांचे कौतुक केले.