। नेरळ । प्रतिनिधी ।
सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या रोटरी क्लब बदलापूर यांच्या माध्यमातून चार आदिवासी वाड्यांवरील जिल्हा परिषद शाळांसाठी पाण्याचे शुद्धीकरण करणारे प्युरिफायर्स भेट देण्यात आले. पावसाळ्यात या प्युरिफायर्सचा उपयोग होईल या हेतूने शाळेतील मुलांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने हे प्युरिफायर्स पावसाळ्यापुर्वीच देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा चिकनीची वाडी, चिंचवली वाडी, कोपर्याची वाडी आणि बेंडशील या चार शाळांना सदरचे वॉटर फिल्टर्स देण्यात आले. रोटरी क्लब बदलापूरचे अध्यक्ष गणराज जैन यांच्यासह रोटरी क्लबचे सोबत हेमंत आपटे, अशुतोष कुलकर्णी, प्रदिप देवधर, किरण राऊत हे रोटरी सदस्य तसेच ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीच्या सरपंच स्वप्ना इरमाळी, उपसरपंच भालचंद्र कांबरी, शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख गोसावी,तसेच मुख्याध्यापक बनसोडे यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक तसेच शारिरीक प्रगतीसाठी भविष्यातही आवश्यक ती मदत करणार असल्याचे यावेळी क्लबकडून देण्याचे आश्वासन देण्यात आले.







