| रसायनी | वार्ताहर |
विणेगाव पंचक्रोशीतील विठाबाई परशुराम बेलोसे उर्फ सर्वांची माय यांचे निधन झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्यातील विणेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश बेलोसे आणि रुपेश बेलोसे यांच्या आजी असलेल्या विठाबाई उर्फ परिसरातील सर्वांची माय म्हणुन त्यांना हाक मारली जायची. कै.कैलास व कै.विलास यांचे अल्पवयीन निधन झाले, तर पती कै.परशुराम यांच्या निधनानंतर त्यांनी आपल्या सुना आणि नातवंचा सांभाळ केला. अतीशय मेहनती, कष्टाळू त्यांचा स्वभाव होता. परिसरातून आलेल्या प्रत्येक माणसाला त्यांनी आपलस करून जमेल तेवढी मदत केली आहे. स्वतःच दुःख असताना दुसर्याचे दुखः पुसण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे अंतिम धार्मिक विधी मंगळवार (दि.14) मे रोजी विणेगाव येथे होणार आहेत.