विठोबा पाटील यांचे निधन

| अलिबाग | वार्ताहर |

कुरुळ ता. अलिबाग येथील ज्येष्ठ ग्रामस्थ, सेवानिवृत्त शिक्षक, दत्त मंदीर ट्रस्ट चे माजी अध्यक्ष श्री. विठोबा सीताराम पाटील गुरुजी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. श्री. विठोबा सीताराम पाटील गुरुजी यांनी करंजा ता. उरण येथे दीर्घ काळ शिक्षक सेवा केली. निवृत्ती नंतर कुरूळ येथे त्यांनी सामजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. कुरूळ येथील मध्यामिक विद्यालयाच्या स्थापने मध्ये त्यांनी मोलाचे सहकार्य केले होते. रसाणी टेकडी वरील दत्त मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष म्हणून त्यांनी बारा वर्षे जबाबदारी सांभाळली. ज्येष्ठ नागरीक संघटनेच्या कामात देखील ते सक्रीय होते. ते धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना भजनाची आवड होती. अलिबाग मधील सुप्रसिध्द विरेन किचन चे मालक वीरेंद्र पाटील यांचे ते वडील होत. त्यांचे मागे मोठा परिवार आहे. विठोबा गुरुजी या नावाने ते ओळखले जात. त्यांचे पार्थिवावर कुरुळ येथील स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version