विवेक ढेपेंना पुरस्कार जाहीर

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव येथील अष्टपैलू व्यक्तिमत्व तथा शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक कमाविलेल्या विवा कॉलेजचे प्राचार्य विवेक रमेश ढेपे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण शनिवार दि.3 जानेवारी 2026 रोजी सायं. 5:30 वाजता मु.सातिर्जे, ता.अलिबाग या ठिकाणी होणाऱ्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात करण्यात येणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंती निमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय, सांस्कृतिक तसेच पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी माजी आ.मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप मित्रमंडळ रायगड, अँड. उमेश ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे हे सोळावे वर्षे आहे. विवेक ढेपे हे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये उतरवून त्यांना प्रोत्साहित करीत असतात. ढेपे यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक व क्रीडा क्षेत्राची विशेष आवड आहे. शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्य करीत असताना रक्तदान शिबीर कार्यक्रमात त्यांचे विवा कॉलेज सक्रिय सहभाग देत असतात. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version