विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे

| अलिबाग । वार्ताहर ।
तालुक्यातील हाशिवरे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने दप्तराविना शाळा या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये एक दिवस व्यावसायिक शिक्षण दिले. नारळाच्या झापांपासून झाडू तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अभ्यासव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे ज्ञान राहावे यासाठी हाशिवरे येथील हितवर्धक मंडळाचे महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने एक वेगळा उपक्रम हाती घेतला. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना नारळाच्या झापांपासून झाडू कसा तयार करावा, याची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. मिळालेल्या व्यावसायिक प्रशिक्षणातून बोध घेत विद्यार्थ्यांनी झापांपासून झाडू तयार केले. या वेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version