रायगडात “गर्जा महाराष्ट्र माझा”चा ललकार

। अलिबाग । प्रतिनिधी ।
बहु असोत सुंदर संपन्न की महान,प्रिय आमुचा एक महाराष्ट्र हा…या गीतांच्या ओळींनी रविवारी अवघा रायगड दुमदुमून गेला. शासकीय, निमशासकीय स्तरावर ध्वजारोहण,त्यानिमित्त पोलीस, विद्यार्थ्यांचे सुंदर संचलन, विविध समाजोपयोगी उपक्रम अशा आनंदमयी वातावरणात जिल्ह्यात महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचा सोहळा उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यानिमित्ताने सन्मानही करण्यात आला.

कर्जतमध्ये तिरंग्याला मानवंदना
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन कर्जत मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रविवारी बहुसंख्य शाळांमध्ये परीक्षांचे निकाल असल्याने तत्पूर्वी त्या शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या शासकीय समारंभास प्रांत अधिकारी अजित नैराळे यांच्या हस्ते धवजरोहण करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार विक्रम देशमुख, यांच्यासह पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सोपान बाचकर, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, डॉ. ज्योती मेगाळ, सुवर्णा निलधे, विशाखा जिनगरे, मधुरा चंदन, शिवसेना तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, शिवराम बदे, पंकज पाटील, अंकुश घोडविंदे, प्रशांत उगले आदी उपस्थित होते.
नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक बळवंत घुमरे, हेमंत ठाणगे, नगरसेविका पुष्पा दगडे, प्राची डेरवणकर, विद्या विकास मंदिर विद्यालयाच्या श्रद्धा मुंढेकर, अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेत मुख्याध्यापक सच्चिदानंद जोशी, शारदा मंदिर विद्यालयात शालेय समिती सदस्य रवींद्र खराडे उपस्थित होते, कोंकण ज्ञानपीठ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिन वविध कार्यक्रमानी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालयात सकाळी 7 वाजता मुरुड नायब तहसीलदार- गोविंद कोटंबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर तहसिलदार कार्यालयातील प्रांगणात तहसिलदार -रोहन शिंदे याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी मुरुड तहसीलदार- रोहन शिंदे, नायब तहसीलदार- गोविंद कोटंबे, निवडणूक नायब तहसीलदार- अमित पुरी,वसंतराव नाईक महाविद्यालयचे -उपप्राचार्य-विश्‍वास चव्हाण,नगरपरिषद कार्यालयीन प्रशासकिय अधिकारी- परेश कुंभार, पोलिस निरीक्षक-नितिन गवारे, स्नेहा पाटील, पांडुरंग आरेकर,संजय वेटकोळी, पुरुषोत्तम आरेकर, साहिल मुजावर, प्रमोद भायदे, अनुजा दांडेकर,चित्यानंद व्हटकर, राकेश पाटील, गोपाल चव्हाण, सतेज निमकर, आदेश दांडेकर, पुलेकर,सुदेश माळी, रुपेश भाटकर, जयेश चोडणेकर अभिजित कारभारी, निलेश शेडगे,मुरुडकर मॅडम, सामाजिक कार्यकर्ते , सर्व तलाठी मंडळ अधिकारी , व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वातंञ्य सैनिक याच्या पत्नी भगत यांना तहसिलदार -रोहन शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version