व्हॉलीबॉल खेळाडूंनी गावाचे नाव उज्ज्वल करावे- आ. जयंत पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गावपातळीवरील व्हॉलीबॉल खेळाडूंनी गावाबरोबर देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन आमदार जयंत पाटील यांनी केले. ते आज रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनतर्फे कोएसो माणकुले हायस्कूलच्या पटांगणात आयोजित जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अ‍ॅड.आस्वाद पाटील, रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील, अलिबाग पंचायम समितीचे सभापती प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन व राज्य संघटनेचे सरकार्यवाह शरद कदम, पंचायत समिती उपसभापती प्रकाश पाटील, अनिल पाटील, राजाभाऊ गावंड, सुभाष पाटील, जगन्नाथ म्हात्रे, सत्यविजय पाटीलन, सुधाकर पाटील, मारुती पाटील, डॉ. मनोज पाटील, कमलाकर पाटील, विक्रम पाटील, शुभांगी पाटील, उपसरपंच योजना ठाकूर, वनिता पवार, प्रदीप पाटील, भरत पाटील, तानाजी पाटील, स्वप्नील पाटील, जितेंद्र पाटील, रमेश पाटील तसेच असोसिएशनचे पदाधिकारी सुनील पाटील, रवींद्र म्हात्रे, रमेश म्हात्रे, प्रसन्ना पाटील, दर्शना शिंदे, परिसरातील ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, व्हॉलीबॉल हा खेळ खारेपाटबरोबर संपूर्ण जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने खेळला जात आहे. या खेळाला पुढे आणण्यासाठी डायरेक्ट व्हॉलीबाल प्रमोशन ही संघटना प्रयत्न करत आहे. यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. देशाचे पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाांना स्टेटस देण्याची चळवळ तसेच ऑलिंपिकबाबातही वेगळी भूमिका घेतल्याने आपल्या देशाला सुवर्णपदक मिळायला लागली आहेत, ही बाब अभिमानस्पद असून, जागतिक बँकेनेही याचे मूल्यांकन केल्याने त्याचा फायदा तळागाळातील खेळाडूंना होत आहे, असे सांगितले.

प्रास्ताविकात डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे सरकार्यवाह शरद कदम यांनी या खेळाबद्दल थोडक्यात माहिती दिली. याप्रसंगी रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते विद्याधर ठाकूर यांचा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे सूत्रसंचालन स्वप्नील पाटील यांनी, तर जगन्नाथ म्हात्रे यांनी आभार मानले.

Exit mobile version