मुरूड तहसीलदार रोहन शिंदे यांचे आवाहन
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुरूड तहसीलदार रोहन शिंदे यांनी मुरुड तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर व विविध ठिकाणी जाऊन मतदान आपला अधिकार सुदृढ लोकशाहीसाठी मतदान हा महत्त्वाचा घटक असुन नवमतदारांनी यांचे साक्षीदार व्हावे तसेच, मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन मुरूड तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले.
यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी निवडणुकीचे महत्व, मतदानाची जबाबदारी, युवा मतदारांचे कर्तव्य, निवडणूक प्रक्रिया आदींबाबत आदिवासी महिला पुरुष व युवकांशी संवाद साधला. मतदान वोटर गाईडचे वाटप, मतदारांना मतदार माहिती, यामध्ये मतदारांचे नाव, भाग क्रमांक, खोली क्रमांक आदि आवश्यक माहिती असते. आदिवासी वाड्यांवर मतदारांना वोटर गाईडचे वाटप केले. मतदान ही प्रत्येकांची जबाबदारी असून येत्या 7 मे रोजी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी मुरूड तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले.