। उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवसाचे औचित्य साधून संविधान आणि लोकशाही विचार मंच उरणच्यावतीने देशाच्या सद्याची राजकीय अराजकता आणि दडपशाही विरुद्ध मतदार जनजागृती कार्यक्रमाकरिता बुधवारी (दि.1) धाकटी जुई, विंधणे उरण येथे बैठकीचे आयोजन केले होते.
याप्रसंगी आनंद ओहाळ म्हणाले की, गेल्या दहा वर्षांतील केंद्रं सरकारची कामगीरी अत्यंत निराशाजनक आहे. या केंद्र सरकारची सर्व धेय्य-धोरणे शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या विरोधी आणि फक्त मर्जीतले उद्योगपती व पुंजीपतींसाठी राबविली जात आहे. जे सरकार लोकशाही मोडीत काढून हुकुमशाहीकडे निघाले आहेत त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागेल. तेव्हा येणार्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदारांपर्यंत पोहचून सरकारच्या विरोधात आणि इंडिया आघाडीला मतदान करण्यासाठी त्यांनी आवाहन केले.
तसेच, गावांतील उपस्थित महिलांनी, त्यांना भेडसावत असलेल्या समस्या महागाई, बेकारी आणि शेतकर्यांवर स्थानिक प्रशासनाच्या दडपशाही विरोधात संताप व्यक्त केला. बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करणे, असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. तसेच, यावेळी 1 मे या हुतात्मा दिनाच्या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा आनंदा माया पाटील यांच्या स्मारकास भेट देऊन सर्वांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. याप्रसंगी प्रभाकर घरत, सुनील जोशी, सविता सोनावणे-कदम, जितेश पाटील, गोंधळी आणि परिसरातील महिलांसहित 30 ते 35 नागरिक उपस्थित होते.