निगडीत मतदार जागृती कार्यक्रम

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा तहसीलदार धर्मराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी येथे बुधवारी (दि.17) स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती करण्यात आला. कार्यक्रमासाठी निगडी गावातील बहुतांश मतदार उपस्थित होते. धर्मराज पाटील यांनी इव्हीएम मशीन बाबतीचा मतदाराच्या मनातील गैरसमज दूर करून मतदानाच अधिकार बजावा असे मतदारांना आवाहन केले.

धोंडगे यांनी गाण्यातून उद्बोधन केले. शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांसाठी मतदान जनजागृती संबंधी पत्रलेखन तसेच ग्रामस्थांकडून संकल्पपत्र लिहून घेण्यात आले. यावेळी महसूल तहसीलदार धर्मराज पाटील, मंडळ अधिकारी सलीम शाह, सचिन धोंडगे, वेदिका पाखड, रमेश काप, रफिक हद्दादी, महादेव पाटील, गणुजी बारे, गोरखनाथ माने, रमेश जाधव, जयवंत मोरे, मिलिंद मोरे, प्रणिता काप, स्वप्निल मांडले, अजिंक्य पाटील, प्रणाली बेडसे, पूजा रानगे, ज्योती चौगले, अनुसया पाखड अंगणवाडी मदतनीस विद्यार्थी पालक व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली बेंडसे आणि सूत्रसंचलन रमेश जाधव यांनी केले.

Exit mobile version