बोर्ली, मांडला शाळांतून मतदार जनजागृती रॅली

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरुडचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मांडला आणि बोर्ली केंद्रातील शाळा-शाळांमधून मतदार जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. यासाठी दोन्ही केंद्रातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात भारतीय संविधान, मतदान, प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धती, मतदारांचा हक्क, कर्तव्य याबाबत उद्बोधन करणारे फलक देण्यात आले होते. मुलांना या रॅलीत पाहून पालकही या जनजागृतीत सामील झाल्याचे आश्‍वासक चित्र दिसून आले. रॅलीत मांडला आणि बोर्ली केंद्रातील साधारणपणे तीस शाळांचे 1500 विद्यार्थी सामील झाले होते. याचबरोबर वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘मतदार जनजागृती’ या विषयावर वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचेही शाळास्तरावर आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version