कर्जतमध्ये मतदार जनजागृती रॅली

। नेरळ । प्रतिनिधी ।

मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत मतदारसंघात मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी निवडणूक विभागाच्यावतीने मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये प्रामुख्याने सायकल घेऊन तरुण सहभागी झाले होते. खोपोली येथील छत्रपती शिवजी महाराज चौक ते कर्जत येथील छत्रपती शिवजी महाराज चौक अशी 19 किलोमीटर रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

कर्जत-खालापूर तालुक्यातील खोपोली नगरपरिषद तसेच खालापूर नगरपरिषद आणि दोन जिल्हा परिषद यांचा समावेश 189 कर्जत विधानसभा मतदारांघात आहे. या मतदारसंघात सुमारे साडेतीन लाख मतदार आहेत. या सर्व मतदारांनी मतदान करावे आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये प्रांत अधिकारी आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे, पोलीस उप अधीक्षक तेले, तहसीलदार डॉ.शीतल रसाळ, तहसीलदार आयुब तांबोळी यांच्यासह निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी आणि शाळांचे शिक्षक तसेच नागरिक सहभागी झाले होते.

Exit mobile version