| माणगाव | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तरी सदर निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निर्भयपणे मतदान करावे, यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा-जावळी मतदार जनजागृती अभियान फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो… उठा उठा निवडणूक आली, मतदान करण्याची वेळ झाली…हम सब की एक पुकार, मतदान हमारा अधिकार…नाही विकला जाणार, निर्भय होवून मतदान करणार…अशा घोषणा देत संपूर्ण गावातून फेरी काढून जनजागृती करण्यात आली. सोबत मतदारांनी मतदान करणार असल्याबाबतचे संकल्प पत्र भरून दिले. गावातील मतदार बंधू आणि भगिनींनी सदर जनजागृती फेरीस उदंड प्रतिसाद दिला. येत्या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढवून योग्य उमेदवार निवडून देवू असे आश्वासन दिले. मतदार जनजागृती फेरीसाठी शाळेचे मुख्याध्यापक निलेश उभारे सर, उपशिक्षिका विद्या लोमटे मॅडम, अंगणवाडी ताई सुनिता साजेकर यांनी अतिशय उत्तम नियोजन केले होते. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिया पालकर, सदस्य सिद्धी पालकर, गावचे पोलीस पाटील बाळा पालकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी जावळी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यात आले.