| पाताळगंगा | वार्ताहर |
शाळेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना मतदानांचे महत्व कळावे या उद्दात विचारांतून रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथिल मुख्याध्यापक सुभाष राठोड आणी शिक्षक यांच्या माध्यमातून स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती अभियान राबविण्यांत आले. मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला न जाता, घरी न थांबता मतदान करावे, असे भावनिक साद देण्यात आली. यावेळी गावातील विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.
शासनाच्या या अभियानात तालुक्यात सर्वप्रथम अभियान राबवून शासनाच्या धोरणाच्या अंमलबजावणीत तत्परता दाखविल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यांत आले. यावेळेस सरस्वती कवाद, वैजनाथ जाधव, निकिता गडगे व साक्षी जांभूळकर यांनी मेहनत घेतली. गावातील जेष्ठ नागरिक, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या अभियानाचे कौतुक केले.
स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती
