कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता दि. 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत कार्यक्रम राबविला जाणार आहे. कोकण विभागात अर्ज दाखल करण्यासाठी एकूण 82 कार्यालये निश्‍चित करण्यात आली आहेत. 82 निवडणूक अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. विभागात जिल्हानिहाय परनिर्देशित 76 अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती मनोज रानडे यांनी दिली. यावेळी कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, माधूरी डोंगरे उपस्थित होते.

कोकण विभागातील पाच जिल्हाधिकार्‍यांची सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पदनिर्देशित अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पालघर जिल्हयातील 14, ठाणे – 14, रायगड- 23, रात्नागिरी- 14, सिंधुदूर्ग- 11 अशा 76 अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून यामध्ये सहा. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांचा समावेश आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी सादर केलेल्या नमुना 19 मधील अर्जासोबत संबंधित व्यक्तीने 1 नोव्हेंबर पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये एखादया माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्षे अध्यापनाचे काम केले असल्याबाबत शैक्षणिक संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक विहित नमुना अर्ज कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, प्रांत अधिकारी कार्यालये, तहसिलदार कार्यालये तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या नव्याने तयार करण्यात येणार्‍या याद्यांमध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी आपली नावे नोंदवावी असे आवाहन रानडे यांनी केले.

Exit mobile version