मतदारांनो मनातील मशाल पेटवा: आदित्य ठाकरे

| नेरळ| प्रतिनिधी |

जनतेने आपल्या मनातील मशाल पेटवून देशावर घोंघवणारे वादळ आणि अंधकार दूर करण्यासाठी निर्धार करा, तरुणांचे रोजगार हिरवणारे सरकार यांना पुन्हा सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन देखील ठाकरे यांनी यावेळी केले. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे आयोजित सभेत बोलत होते.

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना किती विषयावर बोलायचे हा प्रश्न माझ्यासमोर आहे. मात्र जनतेने देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. देशातील रिपोर्ट येऊ लागले कोणत्याही परिस्थितीत भाजप 200 पार करणार नाही. देशात अंधकार पसरला आहे, राजकीय गोंधळ दूर करण्यासाठी आपल्या मनातील मशाल पेटण्याची गरज आहे. ती मशाल ईव्हीएम मशीनमध्ये पेटण्याची गरज आहे.

भाजप उत्तर प्रदेशमध्ये देखील 50चे पुढे जाणार नाही, असे ठामपणे सांगून 400 पार तर सोडा त्यांना दक्षिणेत एकाही राज्यात सत्ता येणार नाही असे सोर्स मिळत आहेत. उत्तरेत देखील अनेक राज्यात भाजपची लाट ओसरली आहे. हे दिसून येईल, असा विश्वास तेथे इंडिया आघाडीचे नेते लढत आहेत आणि त्यामुळे भाजप यावेळी कोणत्याही स्थितीत सत्तेत येणार नाही. आज काश्मीरमध्ये भाजपला उमेदवार मिळत नाहीत आणि त्यामुळे त्यांनी काश्मीरसाठी हे केले ते केले सांगत असून ते मतदारांची फसवणूक करायची आहे. आता भाजप नेत्यांना विचारा तुम्ही 400 पार कसे करणार, ते देशातील कोणत्याही राज्यात ठामपणे सांगू शकत नाही. भाजप प्रणित खोके सरकार राज्यात जनतेसाठी काय केलं हे त्यांना विचारायला हवे, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली.

असली सेना हीच आणि जे आपल्याला नकली सेना म्हणत आहेत. त्यांना आपण 25वर्षे कमरेवर घेतले याची आठवण करून देत भाजपने आपल्याला जनतेला सातत्याने फसवले आहे. 2014 आणि 2019 मध्ये जनतेच्या खात्यात काय आले, भाजपची ही यशोगाथा मतदारांनी सर्व जनतेच्या मनात बिंबवले पाहिजे, अशी सूचना इंडिया आघाडीचे कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरे यांनी केली.

आज परिस्थिती अशी आली आहे ती म्हणजे भाजपने दहा वर्षात काय केले हे सांगण्याची हिंमत नाही आणि त्यामुळे काय खायचे काय खाऊ नये कोणते कपडे घालायचे कोणते कपडे घालायचे नाहीत असा प्रचार भाजप करीत आहे. भाजप सध्या महामानवांनी लिहिलेलं संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. त्यांना 400 जागा संविधान बदलण्यासाठी सत्ता पाहिजे आहे, असं मत आदित्य ठाकरे यांनी मांडले. या जाहीर सभेला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सचिन आहिर, मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना ठाकरे गटाने जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश टोकरे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सदस्य ॲड. गोपाळ शेळके, आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, एकनाथ पिंगळे, शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शंकर भुसारी, काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय गवळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या जाहीर सभेत ॲड. शेखर जांभळे यांनी आम आदमी पार्टीकडून तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, दीनानाथ देशमुख, कम्युनिस्ट पक्षाकडून गोपाळ शेळके यांची तर समयोचीत भाषणे झाली.

Exit mobile version