मतदारांनी निर्भीडपणे मतदान करावे: संजय दराडे

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा आणि निवडणूक तयारीचा सखोल आढावा कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी घेतला. रायगड जिल्ह्यात नगरपंचायत व नगर परिषद निवडणूक प्रचार प्रसार जोरात सुरु आहे, अनेक ठिकाणी पोलीस पथसंचलन करून जनजागृती व सुरक्षा व्यवस्था याबाबत माहिती दिली जात आहे. महाड, माणगाव, नागोठणे, पेण आणि कर्जत या प्रमुख ठिकाणी भेट देत त्यांनी पोलीस बंदोबस्त, कायदा-सुव्यवस्था माहितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

यावेळी संजय दराडे यांनी सांगितले की, मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष फोर्स तैनात करण्यात आला आहे.

पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, तसेच जनतेने निर्भीडपणे, कोणत्याही दबावाशिवाय मतदान करावे, असे आवानही केले. यावेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे, पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी तसेच अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version