विद्यामंदिर मंडळसाठी नेरळ येथे मतदान

| नेरळ | प्रतिनिधी |

मुंबई च्या माहीम भागात मुख्य कार्यालय असलेल्या विद्या मंदिर मंडळ संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक रविवारी 7 ऑगस्ट झाली.पदाधिकारी आणि कार्यकारिणी अशी 21 जणांची निवड करण्यासाठी आज मतदान घेण्यात आले.संस्थेच्या नेरळ आणि दादर येथील शाळांमध्ये हे मतदान झाले असून तब्ब्ल 221 आजीव सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.

दादर विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर 404 पैकी 157 मतदारांनी मतदान केले तर नेरळ विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर 72 मतदारांचे मतदान ठेवण्यात आले होते.त्या ठिकाणी 64 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.नेरळ येथील मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष म्हणून पी.बी. विचवे यांनी काम पहिले तर त्यांना मतदान अधिकारी म्हणून एम.के. परदेशी, एस.बी. शिंदे, एच.आर.भगत, आणि एम.जे.पारधी यांनी तर त्यांना केंद्र समन्वयक म्हणून आर पी आवटी यांनी सहकार्य केले.नेरळ केंद्रावर 84 वर्षीय आजीव सभासद सावळाराम ठाकूर यांनी पहिले मतदान केले.

पाच विश्‍वस्त पदांसाठी 10 उमेदवार रिंगणात आहेत,तर अध्यक्ष पदासाठी उर्मिला नायन आणि रवींद्रनाथ फडकर यांच्यात सरळ लढत होत आहे. त्याचवेळी उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत,तर कार्याध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार यांच्यात सरळ लढत होत आहे.हिशोब तपासनीस पदाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असून कार्यकारिणीच्या दहा जागांसाठी 20 उमेदवार रिगणांत आहेत.

Exit mobile version