संकुलांमध्ये सिडकोकडून मतदान जनजागृती

| वाशी | वार्ताहर |

यंदाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी समित्यांना जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात येत आहे.

निवडणूक पार्श्‍वभूमीवर सिडकोतर्फे गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी समिती सदस्यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या गृहनिर्माण संस्थांतील रहिवाशांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता संस्थेच्या आवारात भित्तीपत्रके, निवडणुकीविषयी सूचना प्रसिद्ध कराव्यात. अन्य माध्यमांद्वारेही जनजागृती करून संस्थेतील रहिवाशांना मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

Exit mobile version