सिलेंडरच्या माध्यमातून मतदान जनजागृती

| म्हसळा | प्रतिनिधी |

आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदार जनजागृती मोहीम प्रांताधिकारी डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात सुरु आहे. शुक्रवारी (दि.29) मतदानाचे महत्व घरोघरी पोचावे या उद्देशाने गॅस सिलेंडरच्या माध्यमातून गॅस सिलेंडरवर मतदान जनजागृती स्टिकर चिकटऊन करण्यात आली.

प्रांताधिकारी डॉ. महेश पाटील यांनी म्हसळा येथील कादिरी एच. पी. गॅस एजन्सी येथे भेट देऊन ग्राहकांना प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर देवघर येथे जाऊन ग्रामस्थांना याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले कि, प्रत्येक मतदाराने मतदान करणे हे त्याचे कर्तव्य असून आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करा. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात लोकसभा निवडणुकीसाठी खूप कमी म्हणजे 50% च्या आसपास मतदान होते. हि टक्केवारी 75 ते 80% टक्क्यांपर्यंत पोचावे म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

याप्रसंगी तहसीलदार समीर घारे, विठ्ठल राठोड, धर्मराज पाटील, गणेश तेलंगे, केमनाईक, सईद अहमद जहीर कादिरी, सलीम शहा, श्रीधर महामुनकर, अनिल महामूनकर, बापू महामूनकर, गोरख माने, विलास कदम, अमित महामूनकर, सलीम दोंदीलकर, उदय महामूनकर, आदि उपस्थित होते.

Exit mobile version