। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया आज (दि.21) होत आहे. पाली, माणगाव, तळा, म्हसळा, खालापूर, माणगावमध्ये सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सहा नगरपंचायतींंमध्ये 102 प्रभागसंख्या आहे. त्यापैकी 2 प्रभागांची निवडणूक बिनविरोध झाल्याने 79 प्रभागांमध्ये मतदान होत आहे. या निवडणूकित 17 हजार 344 स्त्री तर 17 हजार 296 पुरुष मतदार आपला हक्क बजावून उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत.