। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया आज (दि.21) होत आहे. पाली, माणगाव, तळा, म्हसळा, खालापूर, माणगावमध्ये सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सहा नगरपंचायतींंमध्ये 102 प्रभागसंख्या आहे. त्यापैकी 2 प्रभागांची निवडणूक बिनविरोध झाल्याने 79 प्रभागांमध्ये मतदान होत आहे. या निवडणूकित 17 हजार 344 स्त्री तर 17 हजार 296 पुरुष मतदार आपला हक्क बजावून उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत.
Election update: सहा नगरपंचायतीच्या निवडणूकिसाठी मतदान सुरु
