वयोवृद्ध, अपंगांचे टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान

। महाड । प्रतिनिधी ।

वयोवृद्ध 85 वर्षांवरील आणि अपंग व्यक्तिंना मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी होणारा त्रास पाहता शासनाने गृहमतदान टपाली मतपत्रिकेद्वारे 7 मे रोजी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी घरी जाऊन त्यांच्याकडून मतदानाचा हक्क मंगळवार (दि.30) एप्रील रोजी बजावून घेतला.

शासन निर्देशानुसार गृहमतदान टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान करून घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक वयोवृद्ध व अपंग व्यक्तीच्या घरी जाऊन मतपत्रिकेद्वारे मतदान करून घेत आहेत. महाड तालुक्यात या मतदानासाठी 345 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली. अर्जा नंतर त्यांच्या घरी जाऊन ते खरोखर या मतदानासाठी पात्र आहेत का, याची चौकशी केली. यानंतर जाहीर केलेल्या तारखेला घरी जाऊन सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मतदान घेण्यात आले. 345 प्राप्त झालेल्या अर्जामधून 2 लोकांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे 243 मतदार आपला मतदानाचा हक्क घरी बजावणार आहेत. या मतदानासाठी दोन दिवस देण्यात आले होते.

Exit mobile version