कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदान

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ व्दिवार्षिक निवडणुकीकरिता सोमवारी (दि.30) मतदान होणार असून, मतमोजणी गुरुवार, दि. 02 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कोकण विभाग शिक्षक मतदार संघ यांनी दिली. कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे जिल्हे समाविष्ट आहेत. या पाच जिल्ह्यांतून (दि.29) सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचारी मतदान साहित्यांसह मतदान केंद्रांवर रवाना होतील.

मतदान सोमवार दि.30 सकाळी 08.00 ते दुपारी 04.00 या कालावधीत होणार आहे. या निवडणुकीकरिता नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनाच केवळ करता येईल. मतमोजणी गुरुवार, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजलेपासून सुरु होईल, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कोकण विभाग शिक्षक मतदार संघ तथा कोंकण विभागाचे उपआयुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

मतदारांसाठी सूचना
मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, फोटोसह सेवा ओळखपत्र, संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम/नोकरी करीत आहेत, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी, भारतीय पारपत्र, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम पब्लिक कंपन्या यांनी कर्मचा-यांना जारी केलेले, खासदारांना आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारा वितरीत मूळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिका-याने दिलेले शारिरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे/पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख सादर करणे आवश्यक राहील, असे भारत निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत.

Exit mobile version