लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास प्रारंभ

| नागपूर | वृत्तसंस्था |

आजपासून पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठीचे मतदान पार पडत आहे. देशातील 102 जागांवर मतदान होत असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागा आहेत. 21 राज्यांत 102 मतदार संघात 1 हजार 625 उमेदवार निवडणूक लढवणार आहे. सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी 6 पर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात आज पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा – गोंदिया, गडचीरोली आणि चंद्रपूर मतदारसंघात मतदान होणार आहे. नक्षली भागासह संवेदनशील मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गडचिरोली मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन मतदानाची वेळ असणार आहे. नागपुरात लोकसभा मतदारसंघात 61 संवेदनशील मतदान केंद्र आहेत तर रामटेक लोकसभा मतदारसंघात 63 संवेदनशील मतदान केंद्र आणि नागपूर आणि रामटेक मतदारसंघात एकूण 4510 मतदान केंद्र आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात 2105 मतदारसंघ, तर रामटेकमध्ये 2405 मतदान केंद्र आहेत. अति संवेदनशील बूथवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मतदान काळामध्ये शहरात सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली असून रामटेक आणि नागपूर लोकसभा उमेदवारांचे भवितव्य मतदार मतपेटीमध्ये टाकणार आहेत.

Exit mobile version