महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत व्योम भगत प्रथम

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत अलिबाग तालुक्यातील व्योम केतन भगत याने उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच रायगड जिल्ह्यात तृतीय आणि राज्य पातळीवर 20 वा क्रमांक मिळवून त्याने यशाची नवी उंची गाठली आहे. वेश्वी येथील पीएनपी होली चाइल्ड सी.बी.एस.ई. स्कूलमधील विद्यार्थी असलेल्या व्योमने आपल्या परिश्रम, चिकाटी आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. या परीक्षेत त्याने एकूण 268 गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भाषा, गणित, मराठी, इंग्रजी तसेच बुद्धिमत्ता या सर्व विषयांमध्ये त्याने उत्तम गुण मिळवले आहेत. या यशाबद्दल त्याला रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्योम भगत याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Exit mobile version