इंग्लंडमधून येणारी वाघनखे शिवरायांची नाहीतः इंद्रजीत सावंत

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराजांनीअफजलखानाचा वध करताना जी वाघनखे वापरली ती वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघनखे मुंबईत दाखल होतील. पण ही वाघनखे शिवरायांची नाहीतच असा दावा इतिहासकार इंद्रजीत देसाई यांनी केला आहे. सावंत यांनी म्हटल्यानुसार, शिवरायांनी अफजलखानाचा वध करताना जे शस्त्र वापरले ते कुठे आहे याची स्पष्टता 1919 पर्यंत होती. कारण हे शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होते. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. पण आता जी वाघनखे आणली जात आहेत, ती शिवरायांनी अफजलखान वधाच्या वेळी वापरलेली वाघनखे नाहीत. जर 1919 पर्यंत ही वाघनखे साताऱ्यात होती, अशा नोंदी आहेत. तर मग 1919 च्या आधी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये जमा झालेली वाघनखे शिवरायांची असू शकत नाही, असे ते म्हणाले.

Exit mobile version