अर्जुनच्या पदार्पणाची प्रतीक्षा

| मुंबई | वृत्तसंस्था |

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर यंदा लीगमध्ये पदार्पण करू शकतो. हंगाम सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मार्क बाऊचर यांनी डावखुर्‍या अष्टपैलू खेळाडूबाबत मोठे वक्तव्य केले. व्यवस्थापनाची नजर अर्जुनवर आहे. त्याला यावर्षी पदार्पणाची संधी मिळू शकते.असा दावा उभयतांनी केला आहे.अर्जून गेल्या दोन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे, परंतु दोन्ही हंगामात तो बेंचवर बसून राहिला आहे. गेल्या रणजी मोसमात त्याने गोव्यासाठी पदार्पणातच शतक झळकावले होते. याशिवाय गोलंदाजीतही त्याने खूप प्रभावित केले होते. तो सध्या गोलंदाजी करत नसल्याचेही पत्रकार परिषदेदरम्यान उघड झाले.

उमेशनचे निवृत्तीचे संकेत
वेगवान गोलंदाज उमेश यादवने क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार सुरु आहे. विश्‍वचषक चार वर्षातून एकदा येतो. कदाचित ही माझी अखेरची स्पर्धा असेल असेल. त्यामुळे आयपीएलमध्ये माझी सर्वोत्तम कामगिरी देण्याचा माझा प्रयत्न असेल. असं सूचक वक्तव्य यादवने केल आहे.

मला आयपीएलमध्ये संधी मिळेल आणि आणखी चार वर्षे वाट पाहण्याऐवजी मला यावेळी भारताच्या विश्‍वचषक संघात स्थान मिळेल, अशी आशा करतो. असही उमेश यादव यावेळी म्हणाला. उमेश यादवने 2011 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. भारतीय भूमीवर 100 बळी घेणार्‍या मोजक्या भारतीय गोलंदाजांपैकी तो एक आहे. गेल्या काही वर्षांपासून तो एकदिवसीय संघातून बाहेर आहे. उमेशचा संघाच्या अनेक विजयात मोलाचा वाटा उचलला.

Exit mobile version