प्रवाशांच्या जिवाला धोका; उपाययोजना करण्याची मागणी
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
वाकण -पाली या महामार्गावरील जंगली पीर जवळ रस्त्याच्या एका बाजूच्या लोखंडी संरक्षण भिंत तुटल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
खोपोली-वाकण महामार्गावर रहदारीत वाढ झाली आहे. या महामार्गावर रात्रंदिवस वाहनाची रहदारी असते. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला जोडणारा वाकण-खोपोली हा रस्ता एक महत्वाचा दुवा आसल्याने त्यामुळे या महामार्गावर रहदारी करणार्या वाहनांची संख्या मोठी आहे. प्रत्येकजण लवकर नियोजित स्थळी पोहोण्यासाठी वाहन अति वेगाने वाहन चालवत असतात. घाईघाईने वाहन चालवत असताना पाली-वाकण मार्गवरील जंगली पीर येथील लोखंडी संरक्षण भिंत तुटल्याने ती लवकर लक्षात येत नाही व तुटलेल्या भिंती जवळ सुरक्षेच्या विषयी कोणतेही उपाय योजना न केल्याने परिणामी अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे.
एमएसआरडीसीच्या अधिकार्यांना वारंवार तक्रारी करून ही उपाययोजना होताना दिसत नाही. प्रवासीवर्गांच्या सुरक्षितेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे उपाय योजना करण्यात आली नाही, ज्या ठिकाणी अपघात क्षेत्र आहे त्या ठिकाणी एमएसआरडीसीकडून उपाययोजना करण्यात कामचुकारपणा करत असल्याचे दिसून येत आहे. या महामार्गावर अनेक औद्योगिक क्षेत्र, पर्यटन स्थळे असल्यामुळे या मार्गावरून छोट्या वाहनांपासून अवजड वाहनांपर्यत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. त्यात हा रस्ता अरुंद असल्याने रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. या जंगली पीर जवळील लोखंडी संरक्षण भिंतीचे दुरुस्ती व्हावी अशी मागणी प्रवाशी व वाहनचालकांकडून होत आहे.