विद्यार्थ्यांची रायगडवर भटकंती

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

वेध सह्याद्री यांच्या वर्धापनदिनानिमित्त वनवासी विकास आश्रम शाळा जांभिवली येथिल आधीवासी विद्यार्थ्यांना विनामूल्य रायगड किल्ल्यावर भटकंती करण्यासाठी नेण्यात आले.

वेध सह्याद्री ही संस्था गडकिल्ले संरक्षण, संवर्धन, जतन, स्वच्छता मोहीम असे उपक्रम गेले कित्येक वर्षे राबवित आहेत. किल्ले रायगडावर जाऊन आलेला व्यक्ती एक सकारात्मक ऊर्जा आणी विचार घेऊन येतो. ज्या मुलांच्या आयुष्यात अनेक संकट आहेत, शैक्षणिक परिस्थिती, आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना आपल्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत, अशा आदिवासी मुलांच्या मनात उत्तुंग अशी सकारात्मक ऊर्जा यावी, शिवछत्रपतींच्या इतिहासातून प्रेरणा घेता यावी म्हणून वेध सह्याद्री मार्फत आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना विनामूल्य दुर्गदुर्गेश्‍वर रायगड दर्शनासाठी नेण्यात आले.

Exit mobile version