मुंबई-गोवा महामार्गावरुन जायचंय? तर नक्की वाचा…

सुकेळी खिंडीत दरडी कोसळु लागल्या
। सुकेळी । दिनेश ठमके ।
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापपर्यंत पाहीजे तसे पुर्ण झालेले नसुन बरेच काम बाकी आहे. यातच पावसाला सुरु झाल्यापासुन महामार्गावरील काम अंत्यत संथगतीने सुरु आहे. त्यातच याच मार्गावरील अपघातासाठी धोकादायक खिंड म्हणुन ओळख असलेल्या सुकेळी खिंडीमध्ये दरडी कोसळु लागल्यामुळे खिंडीमध्ये एकदम भयाणक अवस्था झाली आहे. तसेच अनेक ठिकाणच्या साईडपट्टया, मोरव्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहुन गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरवर्षी सुकेळी खिंड ही पावसाळ्यात वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणीची ठरत आहे.


खिंडीमधील रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खिंडीमधील जे डोंगर खोदले गेले आहेत, त्यामुळे दोन दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसात महामार्गावरील जुन्या रस्त्यावर मोठमोठे दगड व माती मोठ्या प्रमाणात खाली आले होते. त्यामुळे जुन्या रस्त्यावरुन वाहतुक बंद करण्यात आली होती. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात वाहतुक कोंडीदेखील झाली होती. पंरतु महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन नव्यानेच काम करण्यात आलेल्या रस्त्यावरुन जाणारी येणारी वाहतुक चालु केली.

तसेच रस्त्याच्या साईडपट्टया तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या मोरव्या देखिल खचल्या असुन पुढे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यापुढे जर का दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी करायच्या असतील तर योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Exit mobile version