वारकरी निघाले आळंदीकडे

। नेरळ । प्रतिनिधी ।

आळंदी येथे 26 नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आहे. त्यासाठी वारकरी आळंदीकडे मार्गस्थ झाले आहेत. कर्जत तालुक्यातील एक दिंडी वगळता अन्य दिंड्या बुधवारी (दि.20) सकाळी आळंदीसाठी मार्गस्थ झाल्या आहेत. दरम्यान, वारकर्‍यांनी मतदान करूनच आळंदीकडे मार्गस्थ झाले.

आळंदी यात्रेसाठी कर्जत तालुक्यातून 17 दिंड्या वेगवेगळ्या मार्गाने जात असतात. यावर्षी 26 नोव्हेंबर रोजी आळंदी येथे यात्रा आहे आणि त्यामुळे या यात्रेसाठी 18 नोव्हेंबर पासून पायी दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत. कर्जत तालुक्यातील पिंपळोली येथील दिंडी मतदानाच्या आदल्या दिवशी मार्गस्थ झाली असून कदाचीत त्या वारकर्‍यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नसेल. मात्र, अन्य बहुसंख्य पायी दिंड्या या बुधवारी तर काही मंगळवारी आळंदीकडे मार्गस्थ होणार आहेत. नेरळ येथील नेरळ परिसर वारकरी संपद्राय तसेच संत ज्ञानोबा तुकोबा संस्थेची पायी दिंडी रावण झाला. मात्र, त्यांनी सकाळी मतदानाचा अधिकार बाजावून हे सर्व वारकरी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन वारीत सहभागी झाले.

Exit mobile version