आळंदीहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात; चौघे जखमी

| रसायनी | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील चौक वावंढळ येथील वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदी यात्रेसाठी गेले होते. तेथून ते टेम्पोने घरी परतत असताना खोपोलीच्या इंदिरा चौकात टेम्पो चालकाचा ताबा सुटला आणि हा टेम्पो दुकानाच्या कठड्यावर आदळला. या अपघातात चौक वावंढळ येथील किसन पवार, शर्मिला शिंदे, कमल पवार, शारदा पालांडे असे चार वारकरी जखमी झाले. त्यांना खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर भारती दुर्गे, प्रमिला पवार, सीताबाई गायकवाड किरकोळ जखमी झाले आहेत, त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.

Exit mobile version