मृत्यूचा आकडा वेगाने वाढण्याची शक्यता
भारताला सतर्कतेचा इशारा
। लंडन । वृत्तसंस्था ।
संपूर्ण जगात झपाट्याने वाढणार्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. दरम्यान, या नव्या विषाणूमुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे जगाच्या चिंतेत वाढ झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आज सांगितले की, ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनमुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोरानाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण दक्षिण अफ्रिकेत आढळून आला होता. त्यानंतर त्याचा प्रसार होऊन नये यासाठी अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्बंध कडक केले आहेत. भारतानेदेखील ओमिक्रॉनचा धोका असणार्या हायरिस्क देशांमधून भारतात येणार्या विमानांना बंदी घातली आहे. तसेच परदेशातून भारतात दाखल होणार्या प्रवाशांना ठढ-झउठ चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.