| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘माहे’चं सोमवारी (दि. 24) अनावरण करण्यात आलं असून, भारतीय नौदलात ती युद्धनौका सामील झाली. पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांच्या उपस्थितीत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. ‘माहे’ युद्धनौकेत समुद्रातील खोलवर लपलेल्या पाणबुड्या शोधून नष्ट करण्याची क्षमता आहे. कोचीन शिपयार्डमध्ये बांधलेली स्वदेशी बनावटीची ती पाणबुडीविरोधी युद्धनौका आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण आठ युद्धनौका तयार करण्यात येणार आहेत. या युद्धनौकेची एकूण लांबी 78.8 मीटर असून, वजन क्षमता 1150 टन आहे. तसेच वेग 25+ नॉट्स म्हणजेच सुमारे 46 किमी/तासापेक्षा जास्त आहे. तसेच 80 हून अधिक कर्मचारी ही युद्धनौका वाहून नेऊ शकते.







