कार्यक्रम घेण्यास आप्पासाहेबांचा होता विरोध?

राज्य सरकारकडून महाराष्ट्रभूषण पुरस्कारसाठी 2 एप्रिल ही तारीख निश्‍चित करण्यात आली होती. जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब जाहीर कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारण्यास अनुकुल नव्हते. विरोध होता.मात्र राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आग्रहामुळेच रविवारचा हा कार्यक्रम घेण्यात  आला असा दावा काही माहितगारांनी केला आहे.अर्थात याची पुष्टी होऊ शकत नाही.
  कार्यक्रमासाठी उपस्थितांची दोन भूखंडावर बैठक व्यवस्था करण्यात आली होती. दोन्ही मैदानाभोवती श्रीसदस्यांकडून पाण्याची जलवाहिनी टाकण्यात आली होती. तर दर दहा मीटर अंतरावर श्रीसदस्याना पाणी मिळेल अशी व्यवस्था कारण्यात आली होती.

टाटा मेमोरियल रुग्णालयावर आक्षेप
खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालय कॅन्सर रुग्णांवर उपचारासाठी प्रसिद्ध आहे.  उष्माघाताचा फटका बसलेल्या रुग्णांना टाटा मेमोरीयल रुग्णालयात उपचारासाठी नेणेेे योग्य होते का,असा सवालही काही जणांनी केला आहे.

दुर्घटना घडण्याची प्रशासनाला होती कल्पना
लाखो श्रीसदस्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची कल्पना प्रशासनाला  होती. तरीही  बैठक व्यवस्थेभोवती रुग्णावाहिका आणि पाण्याचे टँकर पोहचण्या साठी प्रशासनकडून आधी खूपच अरुंद रस्ते करणअयात आले होते.पण पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी पुढाकार घेत सुरवातीला   या रस्त्यांचे रुंदीकरण करून बारा मीटर रुंदीेचे रस्ते केले अशी माहिती कार्यक्रमस्थळी उपस्थितांनी दिली.

 विविध नेत्यांची भेट
कार्यक्रमानंतर विविध रुग्णालयात  अनेकजण  उपचारासाठी दाखल आहेत. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात देखील 17 रुग्णांवर उपचार सुरु असून,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी नेते अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दाणवे. मनसे नेते राज ठाकरे यांनी एमजीएम रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे.

Exit mobile version