तटकरेंकडून जनतेच्या पैशाचा अपव्ययः पंडित पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |

मतदारांना आकर्षित करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी हेलिकॉप्टरने प्रवास करीत दिखावा सुरु केला आहे. यानिमित्ताने जनतेच्या पैशाचा अपव्यय तटकरेंकडून होत असून, प्रशासकीय यंत्रणेचीदेखील फरपट होत असल्याचा आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांचे जिल्हाभर ठिकठिकाणी दौरे सुरू आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तटकरेंकडून वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करुन युती सरकारवर दबाव टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मात्र, तटकरेंचा हा दिखावा प्रशासनासाठी डोकेदुखी बनत चालला असून, जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप पंडित पाटील यांनी केला.

नेहमीच दहशतवादी व अन्य वादग्रस्तांच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची सरकारने सुरक्षा कमी केली. मात्र, तटकरेंसाठी सुरक्षा का ठेवली जात आहे, असा प्रश्न पंडित पाटील उपस्थित करीत सरकारकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी चालू असल्याचा आरोप केला.

हेलिकॉप्टरसाठी होणारा खर्च सरकारी तिजोरीतून नसून, खासगी आहे. मात्र, हेलिपॅडच्या ठिकाणी लागणारे पोलीस, अग्नीशमन यंत्रणाचा वापर प्रशासकीय यंत्रणेकडून केला जात आहे.

जिल्हा प्रशासन
Exit mobile version